Posts

Showing posts from December, 2021

चित्रपट म्हणजे वास्तव नाही

Image
थिएटरमध्ये 'फुकरे' सिनेमा सुरू होतो. चुचा आणि हनी यांचे कारनामे प्रत्येक टप्यावर पाहताना हसायला येतं. चुचाला रात्री चित्र-विचित्र स्वप्नं पडतात. या स्वप्नात दुसऱ्या दिवशी येणाऱ्या लॉटरीचं कोडं असतं. त्याचा मित्र हनी त्याच्या स्वप्नांचा अर्थ समजावून सांगतो. मग हे दोघे मिळून लॉटरीच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा निर्णय घेतात. यात अजून दोन मित्रांना सामील करून घेतलं जातं. पुढे एका महिलेकडून हे कर्ज घेतात. नशीब आजमावत तर पदरी निराशा येते. मग जिच्या कडून पैसे घेतलेले असतात ती यांच्याकडे त्यासाठी तगादा लावते. वेगवेगळ्या मार्गाने चौघांचा छळ होतो. या छळातून बाहेर पडत या महिलेची अटक घडवून आणतात. असा एकदंर हा सिनेमा. पण सिनेमात दाखवले जाणारे प्रेम प्रकरणे, गैर मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न, पैसे उकळण्याची पद्धत हे सर्व एक प्रेक्षक म्हणून मला खटकतं. कारण चित्रपटात ज्या प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण केले जाते ते पाहून तरुणांना हेच सत्य वाटण्याचा संभव आहे. फुकरे हे फक्त एक उदाहरण आहे. फुकरे प्रमाणे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. आताच्या गली बॉय पासून ते कबीर सिंग पर्यंत अशी ...

परिस्थितीचे गुलाम बनू नका

Image
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपलं ध्येय हे नक्कीच गाठता येतं. यश हे कोणत्याही परिस्थितीचं गुलाम नसतं, पण संघर्षाच्या वेळी माणूस नक्कीच त्याच्या परिस्थितीचा गुलाम बनतो. त्या गुलामगिरीचं बंधन झुगारून, मेहनतीची कास धरून तोच माणूस एक दिवस नक्कीच इतिहास रचू शकतो एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात, परंतु आपण त्या संकटांचा कसा सामना करतो हे आपल्यावर अवलंबून असतं. मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जन्मापासूनच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. मी बऱ्याच अपंग लोकांना पाहिलं आहे ज्यांनी अशा प्रतिकुल परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारलं आहे आणि त्या प्रतिकूलतेच्या विरोधात संघर्ष करून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०१४ मधील युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये पहिलं स्थान मिळवणारी इरा सिंघल ही याचं एक उदाहरण. ती 'स्कोलियोसिस' नावाच्या अपंगत्वाने ग्रस्त आहे. तिने या अपंगत्वाला कधीही स्वतःची कमजोरी मानली नाही आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने या परीक्षेत पहिलं स्थान मिळवलं. तिचा आत्मविश्वास दृढ होता. तिने तिच्या अपंगत्वाला ...

स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यांच्या स्पर्धा

Image
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा संबधित एकापेक्षा एक हादरवून टाकणारे खुलासे करण्यात येत आहेत. हे बघून परीक्षेतील घोटाळ्यांच्या स्पर्धाच लागल्या आहेत असं आता वाटू लागलं आहे. एमपीएससी, आरोग्य विभाग, त्यांनतर म्हाडा आणि आता टीईटीच्या परीक्षेसंदर्भातही घोळ झालेले पुढे येत आहेत. महाराष्ट्रात कोण किती मोठा घोटाळा करतो, याचीच आता स्पर्धा लागलेली आहे. जवळपास सर्व परीक्षा घेणारे विभाग गोंधळ करण्यात तरबेज झाले आहेत. आता म्हाडाचा पेपर फुटल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोषी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या डॉ. प्रितिश देशमुख यांना अटक केली. त्यांच्याबरोबर आणखी दोघांनाही अटक करण्यात आली. असं अटकेचं सत्रच पुणे पोलिसांनी चालवलं आहे. या अटक केलेल्या दोन व्यक्तींकडे ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल तसेच वेगवेगळ्या परिक्षार्थांचे ४० हून अधिक हॉल तिकिट्स आढळून आले आहेत. त्यामध्ये जानेवारी २०२० मध्ये टीईटी परिक्षेला बसलेल्या काही परिक्षार्थांचे हॉल तिकीट होते. टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल तुकाराम सुपे या व्यक्तीला अटक करण्यात आली. या सुपे नावाच्या व्यक्तीकडे तब्बल ८८ लाख रुपये आणि सोनही सापडलं.  टीईटीच्या पर...

कामाचे टेंशन असे जरी, ऑफिसचे वातावरण ठेवा फ्री

Image
" अरे सूरज, आज डब्यात कोणती भाजी आणली आहेस? सूरजने तोंड वेंगात उत्तर दिलं, "कारल्याची भाजी!" आणि त्यावर एकच हशा पिकला. सलग तीन दिवस झाले होते सूरजच्या डब्यात तीच भाजी असायची. तेवढ्यात कुणाल म्हणाला, हा आहेच कडू मग कारल्याला तरी कसं याला सोडावं वाटेल! त्यावर कोणीच हसले नाही आणि काहीसं हसतखेळतं वातावरण कुणालच्या अशा बोलण्याने बिघडलं. सूरजला कुणालच्या या बोलण्याचा राग आला आणि यांच्या दोघात वाद सुरू झाले. तर साधारणपणे ऑफिस म्हटलं, की या गोष्टी नेहमी घडतच असतात. चेष्टा, मस्करी करण्याच्या नादात आपण अशा काही गोष्टी बोलून जातो ज्यामुळे एखाद्याचे मन दुखावते, राग येतो किंवा प्रसन्न, हसतं खेळतं वातावरण गढूळ होऊन जातं. कॉर्पोरेट जग किंवा इतर कोणतेही क्षेत्र घेतले, तरी जिथे आपण काम करतो तिथले वातावरण अगदीच प्रसन्न आणि आनंदी ठेवणे ही तिथल्या प्रत्येकाची जबाबदारी असते. त्यामुळे आपल्याकडून चांगल्या वातावरणाचे वाटोळे होणार नाही याची खबरदारी घेतली, तरी आपोआपच आपण जेथे काम करतो तिथले वातावरण छान राहील व याचा उत्तम परिणाम हा आपल्या कामावर सुद्धा होईल हे निश्चित. सगळ्यांशी हसूनखेळून, मिळून म...

कोरोना देश-दुनिया में LIVE

Image
कोरोना देश-दुनिया में LIVE: फाइजर वैक्सीन के 3 डोज भी ओमिक्रॉन से नहीं बचा सके, US से मुंबई पहुंचा शख्स नए वैरिएंट से संक्रमित  अमेरिका से मुंबई आने वाला एक 29 साल का शख्स ओमिक्रॉन पॉजिटिव पाया गया है, हालांकि उसमें अभी ओमिक्रॉन के लक्षण नहीं दिख रहे हैं। उसे सावधानी के तौर पर अस्पताल में भर्ती कराया गया है। बृहनमुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने शुक्रवार को जानकारी दी कि व्यक्ति ने अमेरिका में फाइजर की तीन वैक्सीन लगवाई थीं। मुंबई एयरपोर्ट पर 9 नवंबर को किए गए कोविड-19 टेस्ट में वह पॉजिटिव पाया गया, जिसके बाद उसके सैंपल को जीनोम सीक्वेंसिंग के लिए भेजा गया। उसके दो हाई-रिस्क कॉन्टैक्ट कोरोना टेस्ट में निगेटिव पाए गए हैं। कोरोना का नया वैरिएंट ओमिक्रॉन दुनियाभर के 91 देशों में फैल चुका है। देर शाम महाराष्ट्र में 8, UP और गुजरात में 2-2 नए मरीज मिले हैं। इस तरह देश में मरीजों की कुल संख्या बढ़कर 113 हो गई है। अन्य प्रमुख अपडेट्स... मुंबई के स्कूल में कोरोना ब्लास्ट, एक साथ 16 बच्चे पॉजिटिव कोरोना और उसके बाद ओमिक्रॉन से सबसे ज्यादा प्रभावित महाराष्ट्र में वायरस का संक्रमण बढ़ता जा रहा है...

गंमत तुमच्या मोबाईल नंबरची...

Image
  आज जगभरामध्ये बहुतांश लोक मोबाईल फोन वापरतात. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाला आकार देण्यात मोबाईल फोनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता संपूर्ण जग हे एक जागतिक कुटुंब बनलं आहे, म्हणूनच या युगाला जागतिकीकरण असं म्हटलं गेलं आहे. आज आपण एकमेकांपासून खूप दूर असलो, तरी खूप जवळ आहोत. त्याचं एकच कारण. ते म्हणजे मोबाईल फोन. या मोबाईल फोनचा जास्त उपयोग कशासाठी होत असतो? तर एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी! आणि हा संपर्क कसा साधला जातो तर मोबाईल नंबरद्वारे ! या तंत्रज्ञानामुळे आता आपण आपल्या दूरच्या नातेवाईकांशी तासन् तास बोलू शकतो. मात्र फोनवर बोलण्यापूर्वी त्याचा नंबर डायल करावा लागतो. भारतातील सर्व मोबाईल क्रमांक फक्त १० अंकी आहेत. जर तुम्ही चुकून ९ अंकी नंबर डायल केला, तर फोन लागत नाही. अशा परिस्थितीत तुमच्यापैकी बहुतेकांना प्रश्न पडला असेल, की भारतात १० अंकी मोबाइल नंबर का आहेत? जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला कॉल करतो त्याआधी आपण डायल करत असलेला नंबर तपासतो, की तो १० अंकांचा आहे की नाही. भारत सरकारची नॅशनल नंबरिंग स्कीम म्हणजेच NNP भारतात १० आकडी मोबाईल नंबर असण्यामागचं पहिलं कारण आह...

मैदानी खेळ आणि मी ......

Image
मैदानी खेळ आणि  मी  मैदानी खेळ: कोणत्याही वयाची कोणतीही व्यक्ती कोणतीही खेळ खेळू शकते, या वयस्क आणि तणावग्रस्त जीवनापासून दूर जाण्यासाठी लोक खेळाकडे वळले आहेत. खेळामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासास मदत होते, कोणतीही गोष्ट काढून टाकण्यास मदत होते. तणावपूर्ण परिस्थिती आणि व्यक्तीमध्ये नवीन धैर्य आणि आनंद फळ देते. हा खेळ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या काळाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना हा खेळ खेळायला आवडते. हा खेळ दोन लोकांमध्ये किंवा दोन गटात खेळला जातो. हा खेळ बक्षीस किंवा आनंद घेण्यासाठी देखील खेळला जातो. दोन प्रकारचे खेळ आहेत मैदानी क्रिकेट, हॉकी, धावणे व्हॉलीबॉल इत्यादी क्षेत्रात बहुधा खेळ, मैदानी खेळ खेळण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, नियमितपणा, धैर्य इत्यादी गुण विकसित होतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भावी जीवन सामूहिक कार्यासारखे होते. विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या विकासा सह गुण विकसित करणे हा आणखी एक प्रकारचा खेळ आहे. घरातील शाळेच्या आत किंवा शाळेतही खेळलेले खेळ, बुद्धीबळ, सुडोकू इत्यादी खेळांमुळे विद्यार्थ्यांची मानसिक सामर्थ्य आणि मन एकाग...

ओमायक्रॉन...! ओ माय गॉड!

Image
कोरोना. धडकी भरवणारा विषाणू. कित्येक आयुष्य उध्वस्त करून सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात देखील या आजाराने माणसाला सावध रहायला, काळजी घ्यायला भाग पाडले. याचे दुष्परिणाम सगळं जग भोगत आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आम्ही जितकं गमावलं त्याची गणती कशातच करता येणार नाही. प्रत्येक वेळी सावध राहून, सर्व नियम पाळून व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर आपण हा आजार जवळ फिरकू नये आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत आलोत, त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच पण मृत्यूदर देखील कमालीचा घटल्याचे आपण बघत आहोत. हे सगळं सामूहिक प्रयत्नांचं यश आहे. आता जो ओमायक्रोन नावाचा हा कोरोनाचा अवतार आला तो देखील परतवून लावण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ह्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून पुन्हा एकदा 'ब्रेक द चैन'चा नारा देत राज्य सरकारने आज शनिवारी म्हणजे ११ आणि उद्या रविवारी १२ तारखेला १४४ कलम लावत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. ह्या विषाणूचा फैलाव अधिक होऊ नये असं वाटत असेल तर आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. सगळे सरकार, व्यवस्था आणि यंत्रणेवर ढकलून चालणार नाही. - शुक्...

आई-बाबा माझे आदर्श ||आई बाबा विषयी निबंध ||

Image
 आपल्या आयुष्यात आपण कोणाला तरी आपला आदर्श मानत असतो. त्याचे गुण आपल्यात यावेत किंवा त्याने जे कार्य केले आहे तसे आपण पण काहीतरी करावे असे आपल्याला वाटत असते. आपल्यात चांगल्या गुणांचा समावेश करून या देशाचा एक उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा प्रत्येकाची असते. आदर्श हा केवळ मोठ्या व्यक्तींचाच घ्यावा असे नाही, तर आपल्यापेक्षा वयाने कमी किंवा आपल्याबरोबरच्या व्यक्ती सुद्धा आपले आदर्श ठरू शकतात. बाहेरच्या व्यक्तीमध्ये आदर्श शोधण्यापेक्षा आपण स्वतःच जर आपल्या मुलांसाठी आदर्श व्यक्ती झालो तर किती भारी होईल ना! कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण जसे वागू त्याचेच अनुकरण त्यांच्याकडून होणे निश्चित असते. लहान वयात मुलांना समज कमीच असते किंवा नसतेच असं म्हटलं, तरी ते वावगं ठरणार नाही. ना कळत्या वयात त्यांच्यावर झालेले संस्कारच त्यांच्या कळत्या वयाचे भविष्य ठरवत असतात. त्यामुळे जर घरातूनच त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले, आदर्श व्यक्तिमत्व काय असते हे त्यांना आपल्या पालकांकडून व पालकांमध्येच पाहायला मिळाले तर उत्तमच. त्यामुळे फार लांब न जाता...

रडणं चांगले आहे ?

Image
 अस म्हणतात की डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. डोळ्यांना ना डोळ्यात जमणारे अश्रु दिसत असतील का? डोळयात माणसाच्या मनाचा तळ दिसतो म्हणतात मग डोळ्यातल्या सरी का दिसत नाहीत. रडणं वाईट असतं तरी मनावरचं दडपण रडल्यावरच कमी होत.होत ना खरं तर डोळे खूप काही सांगून जातात पण ते समजून घेण्याची गरज असते. डोळ्यांची भाषा सगळ्यांना वाचता येत नाही.पण डोळे जितकं खर बोलतात ना तितकं खर कोणीच बोलत नाही. डोळयात सगळ्या प्रकारचे भाव दिसतात.राग दुःख आनंद सगळं . डोळयात निरागसता असते. डोळयात माया असते.प्रेम असते फक्त ते ओळखता यायला हवं. ज्यांना डोळे वाचता येतील त्यांना खरा माणूस कळेल.माणसच मन कसं आहे हे कळेल .मनाचा तळ गाठता येईल.   डोळ्यातल्या आसवांना कधी कधी रोखून ठेवणं अवघड होत.आणि नकळत ते गालावर ओघळतात. तर कधी डोळे भरून आले तरी रडता येत नाही पण रडणं माणसाला खंबीर बनवत.आणि जेव्हा कोणीच समजुन घेत नाही तेव्हाच अश्रु येतात ना. आक्रोश करावासा वाटतो पण तरीही शांत असल्यासारखं भासवाव लागतं. जणू काही झालंच नाही.पण आत किती घुसमट होते ना मनाची.ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. अधूंना वाट मोकळी क...

जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे

Image
'जगात ती लोकं पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि ती लोकं पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो... हा सुविचार काल एका सार्वजनिक मंडळाच्या फळ्यावर चालता चालता वाचला. काही वेळानंतर घरी आलो तरीही हा सुविचार लिहिलेला फळा डोळ्यासामोरून जाईना आणि अचानक मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. मी इयत्ता ९ वी मध्ये असताना प्रचंड आळशी होतो, दुपारची शाळा असल्यामुळे सकाळी लवकर उठायला आळस करायचो. त्यामुळे मला माझे वडील हा सुविचार नेहमी सांगायचे. त्यांचा हा सुविचार सांगण्यामागचा हेतु मी सकाळी लवकर उठून अभ्यास करावा, वाचन करावं आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून अभ्यासाची सवय लागेल हा असायचा. पण तेव्हा मात्र मला त्यांचा हा हेतु समजायचा नाही. मित्रांनो, आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, की सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु बहुतेक लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे वेळा पाळत नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण रात्री उशिरा झोपतो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतो. सकाळी लवकर उठणे कोणालाही आवडत नाही. पण त्याचे अनेक फायदे आहेत. लवकर उठल्यामुळे आपण दिवसभर फिट राहतो. त...