गंमत तुमच्या मोबाईल नंबरची...
आज जगभरामध्ये बहुतांश लोक मोबाईल फोन वापरतात.
या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाला आकार देण्यात मोबाईल
फोनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता संपूर्ण जग हे
एक जागतिक कुटुंब बनलं आहे, म्हणूनच या युगाला
जागतिकीकरण असं म्हटलं गेलं आहे. आज आपण
एकमेकांपासून खूप दूर असलो, तरी खूप जवळ आहोत.
त्याचं एकच कारण. ते म्हणजे मोबाईल फोन. या मोबाईल
फोनचा जास्त उपयोग कशासाठी होत असतो? तर
एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी! आणि हा संपर्क कसा
साधला जातो तर मोबाईल नंबरद्वारे ! या तंत्रज्ञानामुळे आता
आपण आपल्या दूरच्या नातेवाईकांशी तासन् तास बोलू
शकतो. मात्र फोनवर बोलण्यापूर्वी त्याचा नंबर डायल करावा
लागतो. भारतातील सर्व मोबाईल क्रमांक फक्त १० अंकी
आहेत. जर तुम्ही चुकून ९ अंकी नंबर डायल केला, तर फोन
लागत नाही. अशा परिस्थितीत तुमच्यापैकी बहुतेकांना प्रश्न
पडला असेल, की भारतात १० अंकी मोबाइल नंबर का
आहेत?
जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला कॉल करतो त्याआधी
आपण डायल करत असलेला नंबर तपासतो, की तो १०
अंकांचा आहे की नाही.
भारत सरकारची नॅशनल नंबरिंग स्कीम म्हणजेच NNP
भारतात १० आकडी मोबाईल नंबर असण्यामागचं पहिलं
कारण आहे. जर मोबाईल क्रमांक एक अंकाचा असल्यास ०
ते ९ पर्यंत केवळ १० वेगवेगळे क्रमांक तयार करता येतात.
जर तो क्रमांक फक्त २ अंकांमध्ये असेल तर तो १००
लोकांनाच दिला जाऊ शकतो. १० अंक असतील तर त्या
अंकांच्या मदतीने १००० कोटी वेगवेगळे क्रमांक बनवता
येतात आणि हे क्रमांक वेगवेगळ्या लोकांना देता येऊ
शकतात. क्रमांकाच्या या वेगळेपणामुळे मोबाईल क्रमांक १०
अंकी ठेवण्यात आला आहे.दुसरं कारणं म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या.
भारतामध्ये मोबाईल फोनची क्रांती १९९५ पासून सुरु झाली
आणि आजतागायत लाखो नव्हे, तर अब्जावधी भारतीय
लोकं मोबाईल फोनचा वापर करत आहेत. आपल्या देशाची
लोकसंख्या १०० कोटींहून अधिक आहे आणि त्यांपैकी बरेच
जण मोबाईल नंबर वापरतात हे तुम्हाला माहीत आहेच. ही
लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर अशा परिस्थितीत
प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्याला एक वेगळा क्रमांक
मिळायला हवा. त्यामुळे आपला मोबाईल क्रमांक हा १०
अंकी सुरू करण्यात आला. २००३ सालापर्यंत आपल्या
देशामध्ये फक्त ९ अंकी मोबाईल क्रमांक वापरले जात होते.
पण भारताची वाढती लोकसंख्या पाहता ट्राय संस्थेने १०
अंकांचा मोबाईल क्रमांक सुरु केला. त्याच वेळी१५ जानेवारी
२०२१ पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने
लँडलाइनवरून कॉल करताना क्रमांकासमोर शून्य लावण्याचे
आदेश दिले.
तर मित्रांनो, आपले मोबाईल क्रमांक १० अंकी
असण्यामागचं हे आहे खरं लॉजिक. पण आता बरेच लोक
दोन सिमकार्ड वापरायला लागलेत. त्यामुळे मोबाईल क्रमांक
दुप्पट झाले आहेत. तसेच लवकरच वाढत्या लोकसंख्येसोबत
आणि मोबाईल वापरणाऱ्या वाढत्या लोकांमुळे ११ अंकी
मोबाईल क्रमांक भारतामध्ये सुरू केला जाणार आहे.
Comments
Post a Comment