ओमायक्रॉन...! ओ माय गॉड!
कोरोना. धडकी भरवणारा विषाणू. कित्येक आयुष्य उध्वस्त
करून सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात देखील या आजाराने
माणसाला सावध रहायला, काळजी घ्यायला भाग पाडले.
याचे दुष्परिणाम सगळं जग भोगत आहे. कोरोनाच्या पहिल्या
व दुसऱ्या लाटेत आम्ही जितकं गमावलं त्याची गणती
कशातच करता येणार नाही. प्रत्येक वेळी सावध राहून, सर्व
नियम पाळून व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर आपण
हा आजार जवळ फिरकू नये आणि त्यामुळे कोणत्याही
प्रकारचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत आलोत,
त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच पण मृत्यूदर
देखील कमालीचा घटल्याचे आपण बघत आहोत. हे सगळं
सामूहिक प्रयत्नांचं यश आहे. आता जो ओमायक्रोन नावाचा
हा कोरोनाचा अवतार आला तो देखील परतवून लावण्याची
जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ह्या विषाणूची लागण होऊ
नये म्हणून पुन्हा एकदा 'ब्रेक द चैन'चा नारा देत राज्य
सरकारने आज शनिवारी म्हणजे ११ आणि उद्या रविवारी १२
तारखेला १४४ कलम लावत जमावबंदीचे आदेश दिले
आहेत. ह्या विषाणूचा फैलाव अधिक होऊ नये असं वाटत
असेल तर आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. सगळे
सरकार, व्यवस्था आणि यंत्रणेवर ढकलून चालणार नाही.
-
शुक्रवारी देशात या नव्या विषाणूचे २५ कोरोना रुग्ण आढळून
आलेत. यात महाराष्ट्रात मुंबईत ३, पिंपरी-चिचवड येथे ४
रुग्ण आणि पुण्यात १ ओमायक्रोन बाधित रुग्ण आढळले
आहेत. त्यात आता या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर
देशाच्या कोरोना कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही.के.पॉल यांनी
धोक्याचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड मधील रुग्णात
एका ३ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. मुंबईतील एक
रुग्ण धारावीतील आहे. पहिल्या लाटेत धारावीत सर्वाधिक
रुग्णसंख्या होती. पण सरकारने सूक्ष्म नियोजन केल्याने ती
आटोक्यात पण आली होती. यावेळी देखील आधीच्या
अनुभवातून धडा घेऊन सर्वांनी खबरदारी घेऊन सावध राहणे
गरजेचे आहे.
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मुंबईत २
दिवस जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. यामुळे
राजकीय पक्षांच्या रॅली आणि मोर्चांना मनाई करण्यात
आली. एकीकडे हा विषाणू पसरत असताना खासदार
इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी
औरंगाबाद येथून मुंबईकडे रॅली निघाली होती, ती थांबवली
जाईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
खरं म्हणजे या सार्वजनिक क्षेत्रातील लोकांनी आपद्काल
असताना असा रॅली काढण्याचा बेजबाबदारपणा करता
कामा नये, यामुळे यंत्रणांवर तर ताण पडतोच पण संभाव्य
धोका वाढू शकतो हे समजून घ्यायला हवे. ओमायक्रोनच्या
राज्यातील एकूण बाधितांची संख्या शेकडोंच्या घरात जाता
कामा नये यासाठी सर्वांनी सतर्क राहणे व आपले काम-धाम
करताना काळजी घेणे गरजेचे आहे. जे रुग्ण सापडले आहे
ते परदेशातून खास करून आफ्रिकेतून आले असल्याने
त्यांनी स्वतःहून विलगिकरणात जाणे अपेक्षित आहे. पण
असे होत नाही म्हणून या आजाराची व्याप्ती वाढण्याची
शक्यता ओळखूनच धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी काय करावे?
सर्वात महत्वाचे म्हणजे, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे
आणि खूप आवश्यक असेल तर घराबाहेर पडणे आणि
सुरक्षित अंतर राखणे हे नियम पाळावेत.
ज्यांनी लस दोन्ही घेतल्या आहेत त्यांनी देखील हे नियम
पाळायलाच हवेत.
ज्यांनी एक लस घेतली आहे त्यांनी ताबडतोब दुसरी लस
घ्यावी. ज्यांनी लसीकरण अजूनही केले नाही त्यांनी
ताबडतोब करून घ्यावे.Cघ्यावी. ज्यांनी लसीकरण अजूनही केले नाही त्यांनी
ताबडतोब करून घ्यावे
आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही मात्र सगळे निय
पाळून कार्यरत रहायचं हे लक्षात ठेवायचे आहे
धोक्याचा इशारा म्हणजे समुद्रात लाटांची उंची वाढणा
असते तेंव्हा जसे आपण दूर राहतो तसच करायचं बस्स
आता या ओमायक्रोनलाच नाही तर कोणत्याही विषाणूला
थारा द्यायचा नाही, ठरलं तर म
Comments
Post a Comment