Posts

चित्रपट म्हणजे वास्तव नाही

Image
थिएटरमध्ये 'फुकरे' सिनेमा सुरू होतो. चुचा आणि हनी यांचे कारनामे प्रत्येक टप्यावर पाहताना हसायला येतं. चुचाला रात्री चित्र-विचित्र स्वप्नं पडतात. या स्वप्नात दुसऱ्या दिवशी येणाऱ्या लॉटरीचं कोडं असतं. त्याचा मित्र हनी त्याच्या स्वप्नांचा अर्थ समजावून सांगतो. मग हे दोघे मिळून लॉटरीच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा निर्णय घेतात. यात अजून दोन मित्रांना सामील करून घेतलं जातं. पुढे एका महिलेकडून हे कर्ज घेतात. नशीब आजमावत तर पदरी निराशा येते. मग जिच्या कडून पैसे घेतलेले असतात ती यांच्याकडे त्यासाठी तगादा लावते. वेगवेगळ्या मार्गाने चौघांचा छळ होतो. या छळातून बाहेर पडत या महिलेची अटक घडवून आणतात. असा एकदंर हा सिनेमा. पण सिनेमात दाखवले जाणारे प्रेम प्रकरणे, गैर मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न, पैसे उकळण्याची पद्धत हे सर्व एक प्रेक्षक म्हणून मला खटकतं. कारण चित्रपटात ज्या प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण केले जाते ते पाहून तरुणांना हेच सत्य वाटण्याचा संभव आहे. फुकरे हे फक्त एक उदाहरण आहे. फुकरे प्रमाणे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. आताच्या गली बॉय पासून ते कबीर सिंग पर्यंत अशी ...

परिस्थितीचे गुलाम बनू नका

Image
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपलं ध्येय हे नक्कीच गाठता येतं. यश हे कोणत्याही परिस्थितीचं गुलाम नसतं, पण संघर्षाच्या वेळी माणूस नक्कीच त्याच्या परिस्थितीचा गुलाम बनतो. त्या गुलामगिरीचं बंधन झुगारून, मेहनतीची कास धरून तोच माणूस एक दिवस नक्कीच इतिहास रचू शकतो एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात, परंतु आपण त्या संकटांचा कसा सामना करतो हे आपल्यावर अवलंबून असतं. मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जन्मापासूनच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. मी बऱ्याच अपंग लोकांना पाहिलं आहे ज्यांनी अशा प्रतिकुल परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारलं आहे आणि त्या प्रतिकूलतेच्या विरोधात संघर्ष करून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०१४ मधील युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये पहिलं स्थान मिळवणारी इरा सिंघल ही याचं एक उदाहरण. ती 'स्कोलियोसिस' नावाच्या अपंगत्वाने ग्रस्त आहे. तिने या अपंगत्वाला कधीही स्वतःची कमजोरी मानली नाही आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने या परीक्षेत पहिलं स्थान मिळवलं. तिचा आत्मविश्वास दृढ होता. तिने तिच्या अपंगत्वाला ...

स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यांच्या स्पर्धा

Image
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा संबधित एकापेक्षा एक हादरवून टाकणारे खुलासे करण्यात येत आहेत. हे बघून परीक्षेतील घोटाळ्यांच्या स्पर्धाच लागल्या आहेत असं आता वाटू लागलं आहे. एमपीएससी, आरोग्य विभाग, त्यांनतर म्हाडा आणि आता टीईटीच्या परीक्षेसंदर्भातही घोळ झालेले पुढे येत आहेत. महाराष्ट्रात कोण किती मोठा घोटाळा करतो, याचीच आता स्पर्धा लागलेली आहे. जवळपास सर्व परीक्षा घेणारे विभाग गोंधळ करण्यात तरबेज झाले आहेत. आता म्हाडाचा पेपर फुटल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोषी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या डॉ. प्रितिश देशमुख यांना अटक केली. त्यांच्याबरोबर आणखी दोघांनाही अटक करण्यात आली. असं अटकेचं सत्रच पुणे पोलिसांनी चालवलं आहे. या अटक केलेल्या दोन व्यक्तींकडे ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल तसेच वेगवेगळ्या परिक्षार्थांचे ४० हून अधिक हॉल तिकिट्स आढळून आले आहेत. त्यामध्ये जानेवारी २०२० मध्ये टीईटी परिक्षेला बसलेल्या काही परिक्षार्थांचे हॉल तिकीट होते. टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याबद्दल तुकाराम सुपे या व्यक्तीला अटक करण्यात आली. या सुपे नावाच्या व्यक्तीकडे तब्बल ८८ लाख रुपये आणि सोनही सापडलं.  टीईटीच्या पर...

कामाचे टेंशन असे जरी, ऑफिसचे वातावरण ठेवा फ्री

Image
" अरे सूरज, आज डब्यात कोणती भाजी आणली आहेस? सूरजने तोंड वेंगात उत्तर दिलं, "कारल्याची भाजी!" आणि त्यावर एकच हशा पिकला. सलग तीन दिवस झाले होते सूरजच्या डब्यात तीच भाजी असायची. तेवढ्यात कुणाल म्हणाला, हा आहेच कडू मग कारल्याला तरी कसं याला सोडावं वाटेल! त्यावर कोणीच हसले नाही आणि काहीसं हसतखेळतं वातावरण कुणालच्या अशा बोलण्याने बिघडलं. सूरजला कुणालच्या या बोलण्याचा राग आला आणि यांच्या दोघात वाद सुरू झाले. तर साधारणपणे ऑफिस म्हटलं, की या गोष्टी नेहमी घडतच असतात. चेष्टा, मस्करी करण्याच्या नादात आपण अशा काही गोष्टी बोलून जातो ज्यामुळे एखाद्याचे मन दुखावते, राग येतो किंवा प्रसन्न, हसतं खेळतं वातावरण गढूळ होऊन जातं. कॉर्पोरेट जग किंवा इतर कोणतेही क्षेत्र घेतले, तरी जिथे आपण काम करतो तिथले वातावरण अगदीच प्रसन्न आणि आनंदी ठेवणे ही तिथल्या प्रत्येकाची जबाबदारी असते. त्यामुळे आपल्याकडून चांगल्या वातावरणाचे वाटोळे होणार नाही याची खबरदारी घेतली, तरी आपोआपच आपण जेथे काम करतो तिथले वातावरण छान राहील व याचा उत्तम परिणाम हा आपल्या कामावर सुद्धा होईल हे निश्चित. सगळ्यांशी हसूनखेळून, मिळून म...

कोरोना देश-दुनिया में LIVE

Image
कोरोना देश-दुनिया में LIVE: फाइजर वैक्सीन के 3 डोज भी ओमिक्रॉन से नहीं बचा सके, US से मुंबई पहुंचा शख्स नए वैरिएंट से संक्रमित  अमेरिका से मुंबई आने वाला एक 29 साल का शख्स ओमिक्रॉन पॉजिटिव पाया गया है, हालांकि उसमें अभी ओमिक्रॉन के लक्षण नहीं दिख रहे हैं। उसे सावधानी के तौर पर अस्पताल में भर्ती कराया गया है। बृहनमुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने शुक्रवार को जानकारी दी कि व्यक्ति ने अमेरिका में फाइजर की तीन वैक्सीन लगवाई थीं। मुंबई एयरपोर्ट पर 9 नवंबर को किए गए कोविड-19 टेस्ट में वह पॉजिटिव पाया गया, जिसके बाद उसके सैंपल को जीनोम सीक्वेंसिंग के लिए भेजा गया। उसके दो हाई-रिस्क कॉन्टैक्ट कोरोना टेस्ट में निगेटिव पाए गए हैं। कोरोना का नया वैरिएंट ओमिक्रॉन दुनियाभर के 91 देशों में फैल चुका है। देर शाम महाराष्ट्र में 8, UP और गुजरात में 2-2 नए मरीज मिले हैं। इस तरह देश में मरीजों की कुल संख्या बढ़कर 113 हो गई है। अन्य प्रमुख अपडेट्स... मुंबई के स्कूल में कोरोना ब्लास्ट, एक साथ 16 बच्चे पॉजिटिव कोरोना और उसके बाद ओमिक्रॉन से सबसे ज्यादा प्रभावित महाराष्ट्र में वायरस का संक्रमण बढ़ता जा रहा है...

गंमत तुमच्या मोबाईल नंबरची...

Image
  आज जगभरामध्ये बहुतांश लोक मोबाईल फोन वापरतात. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाला आकार देण्यात मोबाईल फोनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता संपूर्ण जग हे एक जागतिक कुटुंब बनलं आहे, म्हणूनच या युगाला जागतिकीकरण असं म्हटलं गेलं आहे. आज आपण एकमेकांपासून खूप दूर असलो, तरी खूप जवळ आहोत. त्याचं एकच कारण. ते म्हणजे मोबाईल फोन. या मोबाईल फोनचा जास्त उपयोग कशासाठी होत असतो? तर एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी! आणि हा संपर्क कसा साधला जातो तर मोबाईल नंबरद्वारे ! या तंत्रज्ञानामुळे आता आपण आपल्या दूरच्या नातेवाईकांशी तासन् तास बोलू शकतो. मात्र फोनवर बोलण्यापूर्वी त्याचा नंबर डायल करावा लागतो. भारतातील सर्व मोबाईल क्रमांक फक्त १० अंकी आहेत. जर तुम्ही चुकून ९ अंकी नंबर डायल केला, तर फोन लागत नाही. अशा परिस्थितीत तुमच्यापैकी बहुतेकांना प्रश्न पडला असेल, की भारतात १० अंकी मोबाइल नंबर का आहेत? जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला कॉल करतो त्याआधी आपण डायल करत असलेला नंबर तपासतो, की तो १० अंकांचा आहे की नाही. भारत सरकारची नॅशनल नंबरिंग स्कीम म्हणजेच NNP भारतात १० आकडी मोबाईल नंबर असण्यामागचं पहिलं कारण आह...

मैदानी खेळ आणि मी ......

Image
मैदानी खेळ आणि  मी  मैदानी खेळ: कोणत्याही वयाची कोणतीही व्यक्ती कोणतीही खेळ खेळू शकते, या वयस्क आणि तणावग्रस्त जीवनापासून दूर जाण्यासाठी लोक खेळाकडे वळले आहेत. खेळामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासास मदत होते, कोणतीही गोष्ट काढून टाकण्यास मदत होते. तणावपूर्ण परिस्थिती आणि व्यक्तीमध्ये नवीन धैर्य आणि आनंद फळ देते. हा खेळ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या काळाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना हा खेळ खेळायला आवडते. हा खेळ दोन लोकांमध्ये किंवा दोन गटात खेळला जातो. हा खेळ बक्षीस किंवा आनंद घेण्यासाठी देखील खेळला जातो. दोन प्रकारचे खेळ आहेत मैदानी क्रिकेट, हॉकी, धावणे व्हॉलीबॉल इत्यादी क्षेत्रात बहुधा खेळ, मैदानी खेळ खेळण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, नियमितपणा, धैर्य इत्यादी गुण विकसित होतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भावी जीवन सामूहिक कार्यासारखे होते. विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या विकासा सह गुण विकसित करणे हा आणखी एक प्रकारचा खेळ आहे. घरातील शाळेच्या आत किंवा शाळेतही खेळलेले खेळ, बुद्धीबळ, सुडोकू इत्यादी खेळांमुळे विद्यार्थ्यांची मानसिक सामर्थ्य आणि मन एकाग...