रडणं चांगले आहे ?
अस म्हणतात की डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर
आहे. डोळ्यांना ना डोळ्यात जमणारे अश्रु दिसत असतील
का? डोळयात माणसाच्या मनाचा तळ दिसतो म्हणतात मग
डोळ्यातल्या सरी का दिसत नाहीत. रडणं वाईट असतं तरी
मनावरचं दडपण रडल्यावरच कमी होत.होत ना
खरं तर डोळे खूप काही सांगून जातात पण ते समजून
घेण्याची गरज असते. डोळ्यांची भाषा सगळ्यांना वाचता येत
नाही.पण डोळे जितकं खर बोलतात ना तितकं खर कोणीच
बोलत नाही. डोळयात सगळ्या प्रकारचे भाव दिसतात.राग
दुःख आनंद सगळं . डोळयात निरागसता असते. डोळयात
माया असते.प्रेम असते फक्त ते ओळखता यायला हवं.
ज्यांना डोळे वाचता येतील त्यांना खरा माणूस
कळेल.माणसच मन कसं आहे हे कळेल .मनाचा तळ गाठता
डोळ्यातल्या आसवांना कधी कधी रोखून ठेवणं अवघड
होत.आणि नकळत ते गालावर ओघळतात. तर कधी डोळे
भरून आले तरी रडता येत नाही पण रडणं माणसाला खंबीर
बनवत.आणि जेव्हा कोणीच समजुन घेत नाही तेव्हाच अश्रु
येतात ना. आक्रोश करावासा वाटतो पण तरीही शांत
असल्यासारखं भासवाव लागतं. जणू काही झालंच नाही.पण
आत किती घुसमट होते ना मनाची.ते शब्दात व्यक्त करता
येणार नाही. अधूंना वाट मोकळी करून देणं गरजेचं असतं.
अणूंची पण किंमत असत असेल ना म्हणून ती रडवणाऱ्या
व्यक्तिलाही मोजावी लागते. किंबहुना आपल्यापेक्षा जास्त.
काही गोष्टी या माणसाला आतून पोखरत असतात तसेच
काही खरच खंबीर बनवतात हे ही तितकेच खरे.पण तरीही
आयुष्यात काहीही झालं तरी कोणाच्या रडण्याच कारण होऊ
नका . आनंद देता येत नसेल तर किमान कोणाच्या तरी
दुःखाचं कारण होऊ नका.यात काहीही साध्य होत नाही.
याउलट कोणीतरी व्यक्ती हसणं मात्र कायमच विसरून जाते
आणि देव सगळीकडे असतो आणि कर्माची फळं सगळ्यांना
मिळत असतात म्हणून निदान विचार करून कृती करत जा .
आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
Comments
Post a Comment