आई-बाबा माझे आदर्श ||आई बाबा विषयी निबंध ||

 आपल्या आयुष्यात आपण कोणाला तरी आपला आदर्श

मानत असतो. त्याचे गुण आपल्यात यावेत किंवा त्याने जे

कार्य केले आहे तसे आपण पण काहीतरी करावे असे

आपल्याला वाटत असते. आपल्यात चांगल्या गुणांचा

समावेश करून या देशाचा एक उत्तम नागरिक बनण्याचा

प्रयत्न करावा अशी इच्छा प्रत्येकाची असते. आदर्श हा केवळ

मोठ्या व्यक्तींचाच घ्यावा असे नाही, तर आपल्यापेक्षा वयाने

कमी किंवा आपल्याबरोबरच्या व्यक्ती सुद्धा आपले आदर्श

ठरू शकतात. बाहेरच्या व्यक्तीमध्ये आदर्श शोधण्यापेक्षा

आपण स्वतःच जर आपल्या मुलांसाठी आदर्श व्यक्ती झालो

तर किती भारी होईल ना! कारण मुलं ही अनुकरणप्रिय

असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे

आपण जसे वागू त्याचेच अनुकरण त्यांच्याकडून होणे

निश्चित असते. लहान वयात मुलांना समज कमीच असते

किंवा नसतेच असं म्हटलं, तरी ते वावगं ठरणार नाही. ना

कळत्या वयात त्यांच्यावर झालेले संस्कारच त्यांच्या कळत्या

वयाचे भविष्य ठरवत असतात. त्यामुळे जर घरातूनच

त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले, आदर्श व्यक्तिमत्व काय

असते हे त्यांना आपल्या पालकांकडून व पालकांमध्येच

पाहायला मिळाले तर उत्तमच. त्यामुळे फार लांब न जाता

आपणच आपल्या पाल्यासाठी एक आदर्श व्यक्ती बनण्याचा

प्रयत्न आताच्या युगात करायलाच हवा. 

आता याचेच उदाहरण द्यायचे झाले, तर आमच्या शेजारीच

राजू नावाचा मुलगा राहतो. त्याचे वडील खूप व्यसनी. त्यांना

सिगारेटचे प्रचंड व्यसन. त्यामुळे राजू हे सगळं

.

लहानपणापासून पाहत आला आणि जसं जसं त्याला

कळायला लागलं तो सुद्धा या व्यसनाच्या आहारी गेला आणि

व्यसनी झाला. म्हणजेच थोडक्यात काय तर व्यसनी

व्यक्तीचा मुलगा व्यसनी, चोराचा मुलगा चोर हे समीकरण

कालांतराने का होईना पण अस्तित्वात येतेच. यावर एक

अधोरेखित होणारे एक उत्तम उदाहरण देता येईल ते म्हणजे

साने गुरुजींचे. साने गुरुजी यांचे नाव आजतागायत आदर्श

लोकांमध्ये घेतले जाते कारण त्यांनी आपल्या आईला आदर्श

मानून साऱ्या जगाला चांगली शिकवण देण्याचे कार्य केले.

साने गुरुजी यांचे नाव गाजले कारण त्यांच्या आईने

त्यांच्यासाठी आदर्श घालून दिले होते तेव्हा कुठे श्यामचे साने

गुरुजीमध्ये रूपांतर शक्य झाले.

सध्या साने गुरुजी आपल्याला निर्माण करणे शक्य नसले तरी

किमान त्यांच्या आईने शिकवलेली शिकवण लक्षात घेऊन,

तरी आपण तसे बनण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो.

मीना माझी मैत्रीण तिची आई डॉक्टर. त्यामुळे मीनासमोर

एक आपल्या आईचे सतत रुग्णांची सेवा करण्याचे,

समाजासाठी झटण्याचे रूप समोर होते. यावरून तिला

आपणही आपल्या आईसारखे व्हावे. समाजासाठी काहीतरी

करावे ही भावना वाढीस लागून तिने सुद्धा डॉक्टर होण्याचे

ठरवले व ती त्यात सफल सुद्धा झाली. असेच एक मोठे

आणि अतुलनीय उदाहरण बाबा आमटे व प्रकाश आमटे

यांच्या रूपात सुद्धा आपल्याला देता येईल. वडिलांचे कार्य,

त्यांची व त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन आज प्रकाश

आमटे सुद्धा समाजासाठी कार्यरत आहेत. म्हणजेच काय

त्यांना कुठे लांब जाऊन एखादा आदर्श डोळ्यासमोर

ठेवायला लागला नाही. आपल्या वडिलांचे कार्य आदर्शभूत

मानून ते आज उल्लेखनीय कार्य करत आहेत.

"तुझे वडील किती भारी आहेत. मला त्यांच्यासारखंच

बनायचं आहे. " एवढे एक वाक्य सुध्दा आपल्याला ऐकायला

किती भारी वाटते. मग जेव्हा हेच आपल्या मुलाकडून

आपल्याला ऐकायला मिळेल तर जीवनाचे सार्थक झाल्याची

भावनाच आपल्याला मिळेल यात शंका नाही. जेव्हा

घरातूनच मुलांना हे उत्तम संस्कार मिळतात तेव्हा

आपोआपच मुलांवर आपले व्यक्तिमत्त्व घडवताना याचा

चांगला परिणाम होतो. जर घरातूनच शिव्या, भांडण तंटे, वाद

किंवा इतरही वातावरण दूषित करण्याच्या घटना घडत

असतील तर याचा वाईट परिणाम हा मुलावर देखील होत

असतो. "तू हे का केलं, तुला कळत नाही का?" असे प्रश्न

जेव्हा आपण मुलांना विचारतो तेव्हा कुठेतरी याची सुरूवात

किंवा याला जबाबदार आपण पालक सुद्धा असतो याचे भान

सगळ्यांनी ठेवायला हवे. तेव्हा एक चांगले, संस्कारक्षम

आणि आदर्शभूत पालकाचे रूप सगळ्यांनी आपल्या

पाल्यासमोर ठेवला, तर देशाचे भविष्य उज्ज्वल ठरेल यात

तीळमात्र शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

ओमायक्रॉन...! ओ माय गॉड!

परिस्थितीचे गुलाम बनू नका

कामाचे टेंशन असे जरी, ऑफिसचे वातावरण ठेवा फ्री